तीन राज्यांत शंभरावर घरफोड्या : कुख्यात चाेरट्याला अटक

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
- 19 लाखांचा माल जप्त
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Thief arrested एखाद्या चाेरट्याने तब्बल तीन राज्यातील विविध शहरात घरफोडीची मालिका लावली हाेती. ताे नेहमी पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून जायचा. तीन राज्याची पाेलिस त्याचा पाठलाग करीत हाेती. मात्र, पाेलिसांना गुंगारा देण्यात पटाईट असलेल्या चाेरट्याला नागपूर पाेलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून साेन्या-चांदीच्या दागिण्यांसह 19 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. संदीप खेमचंद टेंभरे असे अटकेतील या सराईत चाेरट्याचे नाव आहे. त्याने शंभरावर घराेड्या केल्या असून नागपूर शहरातील 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
 
 
clhor
 
Thief arrested  गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली हाेती की, अभिलेखावरील सराईत घरफोडी करणारा आराेपी संदीप टेंभरे (27, चिडिया पलारी, जि. सिवनी, मध्यप्रदेश) हा नागपूर शहरात संशयास्पदरित्या फिरत आहे. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी मानकापूर रिंग राेड परिसरात सापळा रचून त्याला जाळ्यात अडकवले. आराेपीची सखाेल चाैकशी केली असता त्याने साथिदारांच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यात अनेक घराेड्या केल्याची कबुली दिली. पाेलिसांनी या आराेपीच्या ताब्यातून साेन्या-चांदीचे दागिने आणि लगड, लाखांची कार, एक दुचाकी, 4 हजार 500 रुपयांची राेकड, दाेन माेबाईल, एक इलेक्ट्राॅनिक वजन काटा आणि घराेडीसाठी वापरलेली हत्यारे असा एकूण 19 लाख 91 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक दिलीप चंदन, प्रवीण मून, स्वप्निल पाटील आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
शंभरापेक्षा जास्त घराेड्या
आराेपी संदीप टेंभरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूरसह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळून शंभरपेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या ताज्या कारवाईमुळे गिट्टीखदान, काेराडी, सक्करदरा आणि मानकापूर पाेलिस ठाण्यांतर्गत येणारे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्या साथिदारांचा शाेध सुरु आहे.