तळीरामाचा तांडव .. प्रचंड वाहतूक कोंडी

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
पिंपरी-चिंचवड
traffic jam, शहरातील गोंधळाचे ठिकाण मानले जाणारे डांगे चौक काल रात्री एका मद्यधुंद रिक्षाचालकाच्या गैरव्यवहारामुळे अक्षरशः ठप्प झाले. रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास वाहतूक अडथळा निर्माण केला, ज्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
 

traffic jam, Dange Chowk congestion, Pimpri-Chinchwad 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,traffic jam,  ही घटना डांगे चौकातील एका हॉटेल समोर घडली. रिक्षाचालक स्पष्टपणे दारूच्या नशेत होता आणि रस्त्यावर रिक्षा आडवी उभी करून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केला. परिणामी, परिसरात लांबलचक वाहनांची रांग लागली आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.नागरिकांनी रिक्षाचालकाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आक्रमक पवित्र्यात असल्याचे सांगण्यात आले. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस याबाबत कारवाई करण्याची शक्यता आहे, तर शहरातील वाहतूक नियंत्रकांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि गर्दीच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.