दोन युवक वैनगंगेत बुडाले

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
ब्रम्हपुरी, 
मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेले दोन युवक Wainganga river वैनगंगा नदी पात्रात बुडाले. ही घटना रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तालुक्यातील खरकाडा येथे घडली. शुभम विजय सहारे (19), शुभम पुष्पराज बगमारे (24) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.
 
 
banganga
 
खरकाडा गावातील 7 ते 8 मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी वैनगंगा नदी काठावर पार्टी करण्याकरिता गेले होते. जेवणाचा बेत नदीच्या पलीकडे असलेल्या कोंढाळाच्या बाजुला आखण्यात आला. जेवण आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास परतत असताना पिंपळगाव-खरकाडा हद्दीतील नदीपात्रात काही मित्रांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही. शुभम सहारे, शुभम बगमारे यांच्यासह राज सहारे, गौरव वाघधरे हे चौघे आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र, त्या ठिकाणी खोल डोह होता. पाण्याचा अंदाज आला न आल्याने चौघेही बुडू लागले. यावेळी इतर मित्रांनी प्रसंगावधान राखून राज आणि गौरव या दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र शुभम सहारे व व शुभम बगमारे हे दोघे पाण्यात बुडाले.
 
 
 
Wainganga river घटनेची माहिती कळताच गावकरी आणि ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी शोधमोहिम राबवून बुडालेल्या युवकांचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले. परिणामी मोहीम थांबवावी लागली. सोमवारी सकाळपासून स्थानिक मच्छिमार आणि प्रशासनाच्या मदतीने पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली. वृत्तलिहेपर्यंत बुडलेल्या युवकांचा शोध लागला नव्हता.
 
तरूणाचा वाढदिवशीच वर्धा नदीत बुडून मृत्यू
माजरी : Wainganga river मित्राला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या युवकाचा माजरी येथील वर्धा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. विजय प्रेमनाथ यादव (22, रा. मोहबिया दफाई, वॉर्ड क्र. 1, माजरी) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सहा मित्रांचा समूह एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नदीकाठी गेला होता. यावेळी काही युवक पाण्यात उतरले. वाढदिवस असलेला युवक अचानक खोल पाण्यात बुडू लागला. हे बघून विजय यादव याने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती कळताच माजरी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच चंद्रपूर जिल्हा बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, अंधार झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. त्यानंतर सोमवारी सकाळापासून पुन्हा शोधमोहिम राबविली असता, मृतदेह सापडला. .