सोनेगाव तलावात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :02-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Sonegaon lake नागपूर शहरातील मनिष नगर परिसरातील प्रभाग क्र. ३६ मधील सोनेगाव तलावात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनिष नगर परिसरातील रहिवासी सतीश त्रिपाठी आपल्या मित्रासमवेत तलावाजवळ आले असता व्हिडीओ काढण्याच्या मोहात पाण्यात उतरला. काही अंतर पल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो तळाला गेला आणि वर आला नाही. घटनास्थळी त्याचा मित्र प्रत्यक्षदर्शी म्हणून पोलीसांना माहिती दिली.

Sonegaon lake
 
घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले, त्यांनी तलावाची पाहणी केली आणि मनपा अग्निशमन विभागासोबत समन्वय साधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेनंतर नगरसेविका माया हाडे यांनी पोलीस प्रशासनाला तलाव परिसरात सुरक्षा आणि गस्त वाढविण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या. Sonegaon lake नागरिकांना, विशेषतः तरुण-तरुणींना, रिल्स शूट करण्यासाठी व्हिडीओ काढण्याच्या मोहात तलावाच्या काठावर किंवा पाण्यात उतरू नयेत आणि सुरक्षित अंतरावरच काळजीपूर्वक उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य: सौरभ निनावेकर, संपर्क मित्र