अवघ्या १९ वर्षांच्या कुस्तीपटूला भर चौकात फाशी; इराणच्या कठोर कारवाईने जग स्तब्ध!

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
तेहरान, 
wrestler-hanged-in-public-iran अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असतानाच इराणमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय  कुस्तीपटू सालेह मोहम्मदी याच्यासह तिघा तरुणांना सरकारने सार्वजनिकरित्या फाशी दिल्याची माहिती समोर आली आहे. इराणमधील सरकारी माध्यमे आणि मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, कोम शहरात जमावासमोर ही शिक्षा देण्यात आली. फाशी देण्यात आलेल्यांमध्ये सालेह मोहम्मदी, सईद दाऊदी आणि मेहदी घासेमी यांचा समावेश होता.
 
wrestler-hanged-in-public-iran
 
८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान दोन पोलिसांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला होता. डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या आणि जानेवारी २०२६ पर्यंत चाललेल्या देशव्यापी आंदोलनांच्या संदर्भात दिलेली ही पहिली फाशी असल्याचे सांगितले जात आहे. wrestler-hanged-in-public-iran मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या शिक्षेवर तीव्र आक्षेप घेत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आणि जनतेत भीती निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
इराण मानवाधिकार संघटनेचे प्रमुख महमूद अमीरी-मोगद्दाम यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की, या तिघांना छळ करून कबुलीजबाब देण्यास भाग पाडण्यात आले. चौकशी प्रक्रिया निष्पक्ष नव्हती आणि ही शिक्षा बेकायदेशीर हत्येसारखीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी इशारा देत सांगितले की, येत्या काळात आणखी आंदोलकांना सामूहिकरित्या फाशी देण्याची शक्यता आहे आणि हा गंभीर धोका आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मानवाधिकार संघटनांच्या मते, आरोपींवर ‘देवाविरुद्ध युद्ध छेडल्याचा’ आरोप ठेवण्यात आला होता, जो इराणमध्ये मृत्युदंडास पात्र मानला जातो. त्यांना स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिली गेली नाही आणि दबावाखाली कबुली देण्यास भाग पाडले गेले, असा आरोपही करण्यात आला आहे. इराणी खेळाडू आणि कार्यकर्त्या निमा फार यांनी या शिक्षेला स्पष्टपणे राजकीय हेतूने केलेली हत्या असे संबोधले आहे. wrestler-hanged-in-public-iran समाजात भीती पसरवण्यासाठी आणि विरोध दडपण्यासाठी खेळाडूंनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.