नागपूर,
Airline आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर आणि शारजा दरम्यानची थेट विमानसेवा ३१ मार्चपर्यंत रद्द केली आहे. आखाती देशातील वाढता तणाव आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Airline यामुळे नागपूर ते शारजा आणि आखाती देशांमध्ये प्रवास करणार्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमान कंपनीने बाधित प्रवाशांना परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दोहा विमानसेवा आधीच रद्द करण्यात आल्यामुळे नागपूरहून आणि कतारमार्गे इतर देशांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.