मशिदीतील इमामाने कर्मचाऱ्याला मशिदीतमध्ये पेट्रोल ओतून जाळले

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
टोंक,
Employee burned in mosque राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील दिग्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कलामंडा गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. मशिदीत इमाम म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने आपल्या एका कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये कोंडून पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीत हकीम म्हणून काम करणाऱ्या तरुणासोबत आरोपीचा काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. रागाच्या भरात आरोपीने त्या तरुणाला बाथरूममध्ये कोंडले आणि त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
burn death
 
या घटनेनंतर गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी जयपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर तरुण सुमारे ऐंशी टक्के भाजला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावाचे वातावरण असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, या घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी आणि पीडित तरुण यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्या वादातूनच आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी इमाम घटनेनंतर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. त्याच्या संभाव्य ठिकाणांवर शोधमोहीम सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण असून, नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.