नागपूर,
Hawrapeth Nagpur हावरापेठ येथील गणपती-हनुमान मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आलेयावेळी सकाळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर मंदिरातील मूर्तींचे मंगलस्नान व पूजन दिनेश बांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर भगव्या ध्वजाचे पूजन अशोक रणदिवे यांच्या हस्ते करून मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना गुढीपाडव्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठण, आरती आणि गाठीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले.Hawrapeth Nagpur राष्ट्रवंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी बंडू अहिरराव, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, दिनेश बांगडे, राजू इटनकर यांच्यासह सुनिता गायकवाड, शुभम बांगडे, तुळसा गायकवाड व इतर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र