एप्रिल महिन्यात ‘एसआयआर’ मोहीम जिल्हाधिकारी येरेकर यांची माहिती

केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची बैठक

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
अमरावती,
district collector yerekar निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यांच्या सुधारणेसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीम (एसआरआर) हाती घेण्यात येणार आहे. राज्यात साधारणत: एप्रिल महिन्यात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देऊन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी सध्या सुरू असलेल्या मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश दिले.
 

निवडणूक आयोगाकडून मतदारयाद्यां 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मतदारयाद्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहिमेबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव आदी उपस्थित होते.
 
जिल्हाधिकारी येरेकर यांनी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहिमेबाबत माहिती दिली. निवडणूक आयोगाकडून सध्याच्या मतदारयाद्या ह्या २००२ च्या मतदारयाद्यांशी जुळविण्यात येत आहे. या मॅपिंगच्या कामात जास्तीत जास्त मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग करावे लागणार आहे. मॅपिंगमधून उर्वरित मतदारांची पाच दिवसांत सुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात मॅपिंग होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत ४६ टक्के मतदारांचे मॅपिंग झाले आहे. येत्या दहा दिवसात हे प्रमाण ८० टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत.
 
मॅपिंगचे काम सुकर करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ज्या मतदारांचे मॅपिंग करावयाचे आहे, ती यादी आणि २००२ ची मतदारयादी तयार ठेवावी. त्यानंतर येत्या दहा दिवसात प्रत्येक घरी जाऊन मतदारांची जुळवणी करावी. ही सर्व कामे संगणीकृत आहेत, तसेच यासाठी दोन अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.district collector yerekar त्यामुळे ही कामे करण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून कुशल मनुष्यबळ पुरविण्यात यावे. मॅपिंगच्या कामाचे प्रमाण वाढल्यास विशेष व्यापक पुनरिक्षण मोहिमेतील ताण कमी होणार आहे. त्यामुळे मॅपिंगची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.