पंजाबच्या युवकांना दोन पिस्तुलांसह पकडले

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवरील घटना
 
धारणी, 
मेळघाटच्या सुरक्षित जंगलाला लागून असलेल्या मध्यप्रदेशाच्या बर्‍हाणपूर जिल्ह्यातील Khaknar taluka खकनार तालुक्यातील पाचोरी येथे अवैध पिस्तुली व मॅगझीन निर्मिती करणारे अनेक कारखाने कार्यरत असल्याचे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. १८ मार्च रोजी मध्यप्रदेश पोलिसांनी दोन आंतरराज्यीय तस्कर युवकांना दोन लाखाच्या मुद्देमालासह पकडल्याने एकच खळबळ उडालेली आहे.
 
 
kha
 
Khaknar taluka धारणी तालुक्याच्या सीमेपासून १८ कि. मी. अंतरावरील खकनार जवळच्या सतोड फाट्याजवळच्या हनुमान मंदिराजवळ पंजाब राज्यातील जसविंदरसिंग जसपालसिंग (२०) रा. रोहिया खास तथा सिमरजितसिंग (१९) यांना पाचोरी येथील बनावटीच्या दोन पिस्तुलांसह अटक करण्यात आली. अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंतरसिंग कनेश, एसडीपीओ निर्भयसिंग उलावा आणि खकनार ठाणेदार अभिषेक जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शंकर लोनो व पोलिस पथकाने यशस्वी कारवाई करत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. मेळघाटच्या सीमेपार असलेल्या पाचोरी गावात अनेक कारवाईनंतर सुद्धा घरोघरी गृहउद्योगासारखे अवैध शस्त्र निर्मितीचे कारखाने सुरू असल्याने मेळघाट व राज्याच्या बुलडाणा जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. या कारवाईत मनोज मोरे, जय मालवीय, दारसिंग, शिवनारायण पाल, वसीम खान यांनी भाग घेतला.