महाराजस्व समाधान शिबिरात प्रमाणपत्र वितरण

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
शिरपूर जैन,
येथील कै कोंडबा तात्या ढवळे कनिष्ठ महाविद्यालयात २० मार्च रोजी Maharajswa Samadhan Camp छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत लाभार्थींना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात गरजू लाभार्थ्यांनी घेतला.
 
 
Samadhan Camp
 
शासनाच्या वतीने राज्यभरात Maharajswa Samadhan Camp  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार शुक्रवार २० मार्च रोजी शिरपूर येथील कै कोंडबा तात्या ढवळे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समाधान शिबिराला उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, ग्रामपंचायत प्रशासक सिंधु कांबळे,तहसीलदार दीपक पुंडे, निवासी नायब तहसीलदार रंजना गोरे, नायब तहसीलदार सुनील देशमुख, अरविंद करंगळे, गटविकास अधिकारी आर. एस. कंकाळ, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. खाडे यांनी केले.
 
 
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तहसीलदार पुंडे यांनी योजनांची माहिती देताना शासन व प्रशासन या बाबत जलदगतीने पुढाकार घेत असल्याचे सांगितले. कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले, रहिवाशी दाखले, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, सातबारा, वारसा प्रमाणपत्र, फेरफार ,८ अ,सह इतर महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली.
 
 
Maharajswa Samadhan Camp  यावेळी विस्तार अधिकारी यादव पळसकर, महसूल मंडळ अधिकारी विजय अवचार, ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र चौधरी, वनविभागाचे मंगेश वाणी, गजानन शिंदे, दीपक लहाने, प्राचार्य अनंत देशमुख, नंदकिशोर उल्हामाले, ढोरखेडा येथील सरपंच मिटकरी, कैलास ढवळे, पत्रकार गजानन देशमुख, कैलास भालेराव,शंकर वाघ, श्याम वाघ,ग्राम महसूल अधिकारी गणेश गवळी, जी. एम. लादे, महसूल सेवक किशोर देशमुख, दिलीप कांबळे यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व शिरपूर मंडळातील तलाठी उपस्थित होते.