7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेला बिल भरणे बंधनकारक
यवतमाळ,
Mahavitaran अमरावती परिमंडळ अंतर्गत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील 7.5 एचपी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे तब्बल 201 कोटी 64 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मार्च महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिल वसुली करत आहेत. त्यामुळे संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले आहे.
महावितरणने स्पष्ट केले की, ‘बळीराजा मोफत वीज योजना’ ही सर्व कृषी पंपधारकांसाठी लागू नसून केवळ 7.5 एचपीपेक्षा कमी क्षमतेच्या कृषीपंपांसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत शासनाने 2025 ते 2030 या कालावधीत अशा पंपांचे चालू वीजबिल शून्य केले आहे. मात्र 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषीपंपधारकांना वीजबिल भरणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत विकेंद्रीत स्वरूपातील सौर प्रकल्प उभारणी, फीडर विलगीकरण, नवीन वीजवाहिन्या, रोहित्रे आणि उपकेंद्र उभारणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परिमंडळातील सुमारे 2 लाख 80 हजार शेतकèयांपैकी जवळपास 70 टक्के शेतकèयांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ मिळत आहे.
Mahavitaran परिमंडळातील 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या एकूण 6076 कृषीपंपधारक शेतकèयांकडे 201 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी आहे. यापैकी अमरावती जिल्ह्यातील 4 हजार 98 शेतकèयांकडे 106 कोटी 2 लाख रुपयांची थकबाकी असून, यवतमाळ जिल्ह्यातील 1 हजार 978 शेतकèयांकडे 95 कोटी 62 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकीदार शेतकèयांना वेळेत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.