थकबाकी करण्याचे स्पष्ट निर्देश
नागपूर,
Mahavitaran's 'March End' Action Planआर्थिक वर्षाच्या अखेरीस महावितरणने महसूल वाढीसाठी कंबर कसली असून, नागपूर परिमंडळातील थकबाकीचे प्रमाण ’शून्य’ करण्यावर भर दिला आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि अशा सर्वच श्रेणींतील ग्राहकांकडील जुन्या व चालू थकबाकीची वसुली येत्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक मानव संसाधन राजेंद्र पवार यांनी आहेत. ’विद्युत भवन’ कार्यालयात आयोजित परिमंडळाच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, महावितरण आपल्या ग्राहकांना अधिक सक्षम, अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र, ही सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार ठेवण्यासाठी वेळेवर महसूल मिळणे ही काळाची गरज आहे. या बैठकीला नागपूर मुख्य अभियंता दिलीप दोडके, शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
थकबाकी शून्यावर आणावी
Mahavitaran's 'March End' Action Planबुटीबोरी विभागात ‘ग्राऊंड झिरो’वर संचालक राजेंद्र पवार यांनी बुटीबोरी विभागीय कार्यालयाला भेट देऊन महसूल वसुलीचा आढावा घेतला विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना महसूल वसुलीच्या कामासाठी मार्गदर्शन केले. तसेच बुटीबोरी उपविभागीय अधिकारी प्रशांत चरपे, शाखा अभियंता कुंभारे व श्रीपाद काळे आणि येथील जनमित्र यांच्यासोबत संवाद साधून वसुलीचा सविस्तर आढावा घेतला आणि दिलेले उद्दिष्ट करण्याबाबत सूचना दिल्या. या प्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके व अधीक्षक अभियंता अमित परांजपे, अभियंता स्वप्नील गोतमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
’नागभवन’ उपकेंद्राला भेट
क्षेत्रिय कर्मचार्यांशी थेट संवाद साधताना पवार म्हणाले की, मार्च महिन्याचे उर्वरित १० दिवस अत्यंत कळीचे आहेत. या काळात जास्तीत जास्त ग्राहकांशी संपर्क साधून थकबाकी शून्यावर आणावी. उपकेंद्राचा गौरव आणि पाहणी: राजेंद्र पवार यांनी ३३/११ केव्ही ’नागभवन’ उपकेंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.