मालेगावच्या केळी तलावात अत्यल्प जलसाठा

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर
मालेगाव, 
Malegaon keli Lake Reservoir शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या केळी तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, सध्या फक्त अत्यल्प मृत जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी उपशामुळे आणि जलसिंचन विभागाच्या दुर्लक्षामुळे तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याच्या उंबरठ्यावर आला आहे.
 
 
keli Lake
 
याच आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जलस्रोतांचा आढावा घेऊन उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, संबंधित जलसिंचन विभाग या सूचनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. तलावात पाणी अत्यल्प असतानाही अनेक पंप दिवसरात्र सुरू असल्याने पाण्याची पातळी अधिक वेगाने घटत आहे. तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यास शहरात गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. कारण याच परिसरातील नळगंगा येथील विहिरीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो.
 
 
Malegaon keli Lake Reservoir  या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांनी वीज वितरण कंपनीला पत्र पाठवून पंपांचे वीज कनेशन तोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कंपनीने केवळ बेकायदेशीर कनेशनच बंद केले असून इतर कनेशन सुरूच आहेत. दरम्यान, जलसिंचन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. गाडगे बाबा नगरमधील नागरिकांनी मागणी केली आहे की विभागाने तातडीने पाणी उपसा बंद करून उपलब्ध जलसाठ सुरक्षित ठेवावा तसेच वन्यजीव व नागरिकांसाठी पाणी राखून ठेवावे.