मी पंकज त्रिपाठीला मारणार होतो - नाना पाटेकर

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
मुंबई
Nana Patekar बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर हे फक्त जबरदस्त अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या थेट आणि तिखट स्वभावासाठीही ओळखले जातात. नुकत्याच एका मुलाखतीत नानांनी एक धक्कादायक किस्सा सांगितला, ज्यात त्यांनी पंकज त्रिपाठी यांना थेट मारण्याची धमकी दिल्याचा अनुभव उलगडला.
 

Nana Patekar, Pankaj Tripathi Bollywood actors 
२०१८ मध्ये रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटात नानांनी खलनायक हरिदेव अभ्यंकरची भूमिका साकारली होती. सेटवर पंकज त्रिपाठी यांची अतिशय लहानशी पोलीस अधिकारीची भूमिका पाहून नानांचा पारा चढला. त्यांनी पंकज यांना थेट विचारले, “तू इथे काय करतोयस?” पंकजने नम्रतेने उत्तर दिले की, “सर, एक छोटी भूमिका आहे. तुम्ही आणि रजनीकांत सरांसोबत काम करता येईल म्हणून मी आलो.”
नानांनी आपली थेट  Nana Patekar  शैलीत सांगितले, “तू इतका मोठा अभिनेता आहेस, तू अशा छोट्या भूमिका का करतोस? जर पुन्हा अशा छोट्या भूमिका स्वीकारल्या तर मी तुला मारेन!” नानांचा हा शब्द फक्त तिखटपणा नव्हता, तर कलाकाराने स्वतःच्या कलेचा आणि स्थानाचा आदर राखावा, हा संदेश होता.आज पंकज त्रिपाठी ‘मिर्झापूर’मधील कालीन भैया, ‘स्त्री’मधील रुद्र भैया आणि ‘फॅमिली मॅन’मधील मिलिंद सारख्या भूमिकांमधून स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्या यशातून नानांच्या कठोर पण प्रेमळ सल्ल्याचा अर्थ स्पष्ट होतो – कलाकाराने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःची किंमत कमी करण्याऱ्या छोट्या भूमिका स्वीकारू नयेत.