गोंदिया जिल्ह्यात मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
- राष्ट्रवादी ओबीसी सेलचे खा. प्रफुल पटेल यांना निवेदन
 
अर्जुनी मोरगाव, 
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील मका उत्पादन होत असूनही अद्याप शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल, गोंदिया जिल्ह्याच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री तथा Praful Patel खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देऊन तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
 

Praful Patel 
 
Praful Patel  खा. प्रफुल्ल पटेल हे शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर आसताना त्याच्या गोंदिया येथील निवासस्थानी पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार सद्या बाजारात मक्याला केवळ १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर शासनाचा हमीभाव सुमारे २४०० रुपये प्रति क्विंटल आहे. या मोठ्या तफावतीमुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना कमी दरात मका विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच, गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आधीच विविध नैसर्गिक व आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना राकाँ तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, राकाँ ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, अर्जुनी मोरगावचे न.पं. सभापती दानेश साखरे, नगराध्यक्ष शालिक हातझाडे, आर. के. जांभुळकर आदी उपस्थित होते. निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदार प्रफुल पटेल यांनी यावेळी दिले.