ग्रापं भवनात राष्ट्र नेत्यांचे फोटो नाहीत

-आ. राजेश बकाने केली अधिकार्‍यांची कान उघाडणी -वायफड जि.प. क्षेत्रातील दौर्‍यात उघडकीस आले प्रकरण

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
देवळी, 
rajesh bakane देवळी विधानसभा मतदार संघातील वायफड जिल्हा परिषद क्षेत्रात विकास कामांच्या भूमिपूजन तसेच जनसंपर्क दौर्‍यावर असताना ग्रापं भवनांमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच मुख्यमंत्री यांचे छायाचित्रं नसल्याचा प्रकार आ. राजेश बकाने यांच्या निदर्शनास आला. या प्रकाराबाबत त्यांनी तात्काळ संताप व्यत करत संबंधित अधिकार्‍यांची चांगलीच कान उघाडणी केली.
 
ग्रापं भवनात राष्ट्र नेत्यांचे फोटो नाहीत 
 
ग्रामपंचायत भवनांमध्ये राष्ट्र नेत्यांचे फोटो नसल्याची गंभीर बाब लक्षात येताच आ. बकाने यांनी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे तक्रार नोंदवली. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आ. बकाने म्हणाले की, ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य व्यवस्थेची मूलभूत संस्था आहे. शासकीय कार्यालयांमध्ये देश व राज्याच्या प्रमुख नेतृत्वाचे छायाचित्र लावणे ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक बाब आहे. मात्र, काही ठिकाणी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, जे अत्यंत गंभीर आहे.rajesh bakane या पृष्ठभूमीवर त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश देत ४८ तासांच्या आत सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे लावावीत, असे आदेश दिले. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींकडून तातडीने आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.