रामरक्षा पठणाने नववर्षाचे स्वागत

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Ramdaspeth Citizens' Forum रामदासपेठ नागरिक मंडळातर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने लेंढरा पार्क मैदान येथे गुढी उभारून गुढीपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.गुढीपूजनानंतर सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले.
 
 
bon
 
 
 
याप्रसंगी मनिषा संत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत गुढीपाडव्याचे महत्त्व व गुढी उभारण्यामागील परंपरेची माहिती दिली.या कार्यक्रमात रामदासपेठ येथील नागरिक पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Ramdaspeth Citizens' Forumउत्कृष्ट वेशभूषेसाठी महिला, पुरुष व लहान मुलांना पारितोषिक देऊन सन्मानचिन्ह आणि गुढीची प्रतिकृती भेट देण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पत्की, श्रीकांत पळशीकर, अरुण मोगरकर, नरेंद्र आसरकर, शोभा आपटे, लता जोशी, विनय दाणी, प्रमोद पटवर्धन, मिलिंद रहाटगावकर, पांडुरंग सुरंगे आदींनी मोलाचे योगदान दिले.
सौजन्य :आशिष नाईक,संपर्क मित्र