मुंबई
Dhurandhar 2 रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर : द रिव्हेंज’ (धुरंधर 2) बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरूवात करत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला. भारतात एकूण 21,728 शोजमधून या चित्रपटाने 102.55 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे शाहरुख खानच्या ‘जवान’चा रेकॉर्डही मोडला आहे.
18 मार्चच्या प्रीव्ह्यू Dhurandhar 2 शोमध्ये चित्रपटाने 43 कोटी रुपये कमावले. यामुळे दोन्ही दिवसांची एकूण कमाई 145.5 कोटी रुपये झाली आहे. ‘धुरंधर 2’ने प्रभासच्या ‘सालार’ आणि ‘कल्की 2898 एडी’सह दाक्षिणात्य चित्रपटांनाही मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. ट्रेड साइट ‘सॅकनिल्क’नुसार, पहिल्या दिवसाची जागतिक कमाई 236.63 कोटी रुपये झाली आहे.चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा रेकॉर्डब्रेक ठरली होती. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, 15 लाखांहून अधिक तिकिटे पूर्वात्री विकली गेली होती, ज्यात पेड प्रीव्ह्यू शोचा समावेश होता.चित्रपटात रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेशिवाय अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश इक्बाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी काही थिएटर्समध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे शोज रद्द झाले, तरीही चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडले आहेत.
प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श Dhurandhar 2 यांनी ‘धुरंधर : द रिव्हेंज’ (धुरंधर 2) पाहून आपला पहिला रिव्ह्यू शेअर केला. त्यांच्या मते, हा सिनेमा फक्त प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाही तर त्यापलिकडे जाऊन उत्कृष्ट कामगिरी करतो. दिग्दर्शक आदित्य धर यांनी सिनेमाद्वारे मोठं व्हिजन समोर ठेवलं आहे. या सिनेमाची सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे त्याची इमोशनल कोर, जी प्रेक्षकांना खोलवर जोडते.
तरण आदर्श म्हणतात की, सिनेमाचा स्क्रीनप्ले इतका दमदार आहे की पाहताना प्रेक्षकांना पापणी मिटण्यासाठीही वेळ मिळणार नाही. ॲक्शन सीन फक्त भडीमार नाहीत, तर त्या मागे अत्यंत प्रभावी आणि तर्कसंगत कारणं दिली आहेत.रणवीर सिंहच्या अभिनयाचं तर भरभरून कौतुक करण्यात आलं आहे. तरण आदर्श यांच्या मते, हा रणवीरच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सिनेमांपैकी एक आहे. संजय दत्त आपल्या दमदार डायलॉग्सनी पडद्यावर आग लावतो, आर. माधवनचा अभिनयही दमदार आहे, तर अर्जुन रामपाल एका क्रूर आणि भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसतो.मुख्य स्टारकास्टव्यतिरिक्त, राकेश बेदी यांनी साकारलेल्या भूमिकेनं सिनेमाला चार चाँद लावले आहेत. तरण आदर्श यांनी सिनेमातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.