पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्की शंभुराज देसाई जखमी

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
सातारा,
Shambhuraj Desai सातारा जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्ष रंगतदार ठरला आहे. सदस्य सभागृहात जात असताना पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुककीत राज्याचे मंत्री शंभूराज देसाई जखमी झाले असल्याचे चर्चा आहे. यानंतर वैद्यकीय यंत्रणा तत्काळ जिल्हापरिषदेत दाखल झाली.
 

Shambhuraj Desai 
जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी झालेल्या संघर्षात भाजपने मोठा डाव खेळत शिंदे गट आणि राष्ट्रवादीला दणका देत आपला प्रभाव दाखवला. संख्याबळाच्या जोरावर भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही महत्वाच्या पदांवर ताबा मिळवला. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदावर निवड झाली तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली.भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचा कथित प्लॅन देखील आखण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या Shambhuraj Desai  वॉचवर असलेल्या सदस्यांना आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवले. मात्र सभागृहात नेताना झालेल्या झटापटीमध्ये त्यांचे हात जखमी झाले.सत्तासंघर्ष आणि राजकीय खेळामुळे सातारा जिल्हा परिषद परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात या घटनांचा परिणाम स्थानिक राजकारणावर आणि पक्षीय समीकरणांवर स्पष्टपणे दिसेल.