आंतरराष्ट्रीय तणावाचा भाजी बाजारावर परिणाम

दरात घसरण, शेतकरी-व्यापारी चिंतेत

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
ठाणे,
Thane vegetable market आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. ठाणे येथील जांभळी नाका परिसरातील मुख्य भाजी बाजारात गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाल्याचे चित्र आहे. निर्यातीसाठी जाणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणात अडकल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाढला असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.
 

Thane vegetable market 
काकडी, दुधी भोपळा, कारली यांसारख्या भाज्यांचा साठा बाजारात वाढल्यामुळे त्यांच्या किमतीत साधारण दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली आहे. बाजारात वाढलेल्या पुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत असून, निर्यातीसाठी तयार केलेला माल कमी दरात स्थानिक बाजारात विकावा लागत आहे.या परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या चिंतेत आहेत. बाजारातील विक्रेत्यांच्या मते, निर्यात लवकर सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसांत भाजीपाल्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मालाचा साठा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी नव्याने माल खरेदी करताना सावध भूमिका घेतली आहे आणि विद्यमान साठा कमी करण्यावर भर दिला जात आहे.
 
 
 
  विक्रीवरही परिणाम 
दरम्यान, इराण-इस्रायल Thane vegetable market संघर्ष याची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारी भाजीपाल्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक कृषी उत्पादन बाजारातच अडकून पडला आहे. परिणामी, भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून भावातही घट झाली आहे.मात्र, या घडामोडींमुळे केवळ दरघटच नव्हे तर विक्रीवरही परिणाम झाला आहे. वाढत्या खर्चामुळे आणि अस्थिर परिस्थितीमुळे ग्राहक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच, व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसला आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाला वापर कमी झाल्याने विक्रीत घट झाली असून, याचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होत आहे.परिस्थिती लवकर सुधारून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली होईल, अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. अन्यथा, दरातील ही घसरण कायम राहिल्यास भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.