तापमान ३३.८ अंश सेल्सिअस
काही भागात तुरळक स्वरूपात पाऊस
नागपूर,
Unseasonal rain with thunder गुढीपाडव्याला मराठी सुरू होताच गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूरसह काटोल तालुक्यात अनेक गावांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. यानंतर शुक्रवारी सकाळी ८.३०च्या दरम्यान अनेक भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पारा घसरला आहे. नागपूरचे तापमान ३३.८ अंश सेल्सिअस नोंदविले. मुख्यत: नागपूर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस झाला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काटोल, सावनेर आणि रामटेक भागात पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे.
उष्णतेपासून काहीसा दिलासा
मध्य भारतात चक्राकार वारे वाहत असून, विदर्भाच्या काही भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस झाला आहे. वार्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. गत काही दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने तापमान वाढले होते. सरासरी ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत नागपूरचे तापमान स्थिरावले होते. पावसामुळे तापमानात घट होऊन उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली असून, आता सरासरी ३३.८ अंश तापमान आहे.
पिके, फळबागांचे काही प्रमाणात नुकसान
Unseasonal rain with thunder नागपूर जिल्ह्यातील विविध भागात वादळी वार्यासह पाऊस झाला. काही भागात तुरळक स्वरूपात पाऊस झाला. त्यामुळे विविध पिके, फळबागांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला असताना तापमान ३९ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. पावसामुळे तापमानात घट होऊन उष्णतेपासून काहीसा मिळाला आहे.