हिंगणघाटात गोरज मुहूर्तावर स्वराधना!

    दिनांक :20-Mar-2026
Total Views |
संस्कार भारतीचा सांज पाडवा
 
हिंगणघाट, 
Wardha Sanskar Bharti वर्धा संस्कार भारतीतील कलाकारांनी हिंगणघाट संस्कार भारतीच्या कार्यक्रमात गुढीपाडव्याच्या सांजेला स्वराधना केली. भती गीत, नाट्य गीत, भाव गीत, आदी विविध गीतगायनाने हिंगणघाटच्या संगीत रसिकांना तृप्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. समीर कुणावार, नप अध्यक्ष डॉ नयना तुळसकर, रमेश धारकर यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले.
 
 
sa
 
तेजोमय नादब्रह्म हे युगल गीत नितीन वाघ, केतकी कुलकर्णी यांनी अतिशय बहारदार पणे सादर करून रसिकाची दाद प्राप्त केली. त्यानंतर कांनडा राजा पंढरीचा हा अभंग हिंगणघाटचे गायक विजय गावंडे यांनी अतिशय तन्मयतेने गाऊन रसीकांची वाहवा मिळविली. केतकी कुलकर्णी यांनी बोलावा विठ्ठल व नितीन वाघ यांनी पंढरपूरचा निळा हे भती गीत सादर केले. हिंदू राष्ट्र संघटकम हे संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावरील गीत अतिशय सुरेलपणे सादर करून वातावरणात बदल घडविला. या चढत्या क्रमाने सादर झालेल्या कार्यक्रमातून एका पेक्षा एक सुमधुर गीत सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. नरवर कृष्णासमान केतकी कुलकर्णी नाट्यसंगीत व या दिलदार मैफलीला ही गझल रसिकानी उचलून धरली. धुंदी कळ्यांना, घन राणी, शुक्रतारा मंद वारा, कुठे शोधिशी रामेश्वर, संध्याकाळी या अशा, विविध भावगीत सादर केली. अतुल रासपायले यांनी खुशखुशीत शब्दात निवेदन करीत मैफल एका उंचीवर नेऊन ठेवली.
 
 
Wardha Sanskar Bharti  काही हिंदी व मराठी चित्रपट गीते सादर करण्यात आली. गीतरामायण मधील मेडली सादर केल्यानंतर ने मजशी ने परत मातृभूमीला या सावरकर यांच्या रचनेने रसिक तृप्त झाले असतानाच वंन्दे मातरम या गीताने शेवट करून कार्यक्रमाची सांगता झाली. प्रवीण गंडाईत यांनी शबरीची उष्टी बोरं काढणारे प्रभू श्रीराम यांचे सुंदर व्यासपीठ तयार केले होते. उदघाट्न सोहळ्याचे संचालन संचालन अर्चना सातपुते ( जवंजाळ) यांनी केले. संजय देशपांडे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी पराग आजनसरे, अमोल झाडे, डॉ. मोहन खेतलं, वैशाली खेतल, मिलिंद सावरकर, सिंधू नंदनवार, निवेदिता वझलवार, जया बनसोड, रमाकांत गायकवाड, हरिदास पाल, अंकित कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.