अमरावतीत मॅफेड्रॉन पुरविणारे सूत्रधार गजाआड

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
मुंबईच्या माहीम व कुर्ला येथील रहीवाशी
७८ ग्रॅम मॅफेड्रॉन पुन्हा जप्त
 
अमरावती, 
मोठया प्रमाणात Amravati Mephedrone अवैधरित्या मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थाचा मुंबईवरून अमरावती शहरात पुरवठा करणार्‍या मुंबईच्या माहीम व कुर्ला येथील दोन मुख्य सुत्रधाराांना अमरावती शहर गुन्हे शाखेने आज ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, ३ कोटीच्या मॅफेड्रॉन जप्ती प्रकरणातील फरार आरोपी अजिम असद शेख रा. माहीम मुंबई हा मॅफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाचा पुरवठा करणारा मुख्यसुत्रधार आहे. तो या प्रकरणातील दुसरा आरोपी शेख समीर शेख अमीर रा. गवळीपुरा अमरावती याला एम. डी.चा पुरवठा करण्यासाठी अमरावतीत येत आहे.
 
 
Mephedrone
 
अजिम असद शेख हा मॅफेड्रॉन धंदा मोठ्या प्रमाणात करतो. यापूर्वी त्याचेवर २०२५ मध्ये तेलंगणा राज्यात ५५० किलो गांजा बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. अजिमने राजस्थान येथून मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बोलावला होता आणि शुक्रवारी रात्री अमरावतीच्या ग्राहकांना देणार होता. या सर्वांना त्याने लालखडी ते नवसारी रिंगरोड येथे बोलावले होते. ही माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. ऑटोतून उतरताच अजिमला पोलिसांनी अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पंच व राजपत्रीत अधिकार्‍यांच्या समक्ष त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने आपली ओळख सांगितली. त्यांच्यासोबत पोलिसांनी शेख्| समीर शेख्| आमीर याला पण ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता ७८ ग्रॅम (एम.डी.) मॅफेड्रॉन पावडर किं ११ लाख ७० हजार व ३ मोबाईल असा एकूण १२ लाख १६ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 
 
Amravati Mephedrone  या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने २३ मार्चपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. चौकशीत त्यांना हा अंमली पदार्थ कोणाकडून व कोडून आणला अशी विचारणा केली असता त्यांनी मांगीलाल उर्फ मांगी रा. राजस्थान व बिरादा राम उर्फ बिरजु सेन रा. मिदीयान राजस्थान यांच्याकडून आणल्याचे सांगितले. अंमली पदार्थांचा पुरवठा करणारा आणखी एक मुख्य सुत्रध्|ार सत्यम गणेश सोनवण्|े (वय ३६, रा. नेताजी नगर कुर्ला वेस्ट मुंबई) याला देख्|ील गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात स.पो.नि. मनीष वाकोडे, महेश इंगोले, अमोल कडू , गजानन सोनुने, पोलिस अंमलदार सुनील लासुरकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, जहीर शेख, सचिन बहाळे, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, विकास गुडधे, अतुल संभे, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सैयद, विशाल वाकपांजर, योगेश पवार, चेतन गुल्हाने, सागर ठाकरे, रंजीत गावंडे, राजीक रायलीवाले, सुरज चव्हाण, निखील गेडाम, संदीप खंडारे, प्रभात पोकळे, चेतन शर्मा, राहुल दुधे यांनी केली.