सौंदड येथे ‘सेव ट्री, सेव फॉरेस्ट’ कार्यक्रम

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
विविध स्पर्धांद्वारे महिलांचा सन्मान

सडक अर्जुनी, 
तालुक्यातील सौंदड येथे जनसेवा बहुउद्देशीय विकास संस्था सौंदडच्या वतीने आणि सरपंच हर्ष मोदी यांच्या पुढाकारातून महिला दिनानिमित्त 'Save Tree, Save Forest' ‘सेव ट्री, सेव फॉरेस्ट’ संकल्पनेवर आधारित प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच हर्ष मोदी यांनी भूषविले, तर उद्घाटन शुभांगी मेंढे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच मोदी यांनी महिला सशक्तीकरणासोबतच पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
 
 
Save Tree
 
'Save Tree, Save Forest' कार्यक्रमात आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ‘उमेद’ ग्रामसंघातील महिलांचा विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रुप डान्स स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे 7,000, 5,000, 3,000 व 2,000 रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागीला सन्मानचिन्ह देण्यात आले. याशिवाय रंगोली, पाककला, एकल नृत्य, समूह नृत्य, फॅन्सी ड्रेस आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. रिता राऊत यांनी केले, प्रास्ताविक रंजना भोई यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन पूजा राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य वर्षा शहारे, प्राची गुडघे (संचालिका, सुपर वूमन गोंदिया), स्नेहा मोदी, अतुल मुरकुटे, अतुल रोगडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
 
 
विशेष आकर्षण ठरले मान्यवरांचे आगमन
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून आर.जे. श्रावा (श्रावणी गिरीश चौधरी) - रेडिओ सिटी 91.1 एफएम, नागपूर तसेच कणिका टहील्यानी (इन्फ्लुएंसर व शो जज) यांची उपस्थिती लाभली.