अशोक खरातच्या अटकेनंतर मिरगावात संतापाची लाट

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
नाशिक,
Ashok Kharat Nashik कॅप्टन अशोक खरातवर अनेक महिलांवर अत्याचार आणि लैंगिक शोषण करण्याचे गंभीर आरोप आहेत. भोंदूगिरी, धमकावणी आणि राजकीय बळाचा वापर करून जमिनी हडपल्याचा आरोपही समोर आला आहे. या काळ्या कारनाम्यांमुळे समाजमन हादरले असून, खरात जेरबंद होताच अनेक लोक तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.
 

Ashok Kharat Nashik sexual assault allegation 
नाशिक जिल्ह्यातील मिरगावातही खरातच्या अटकेनंतर मोठा उद्रेक पाहायला मिळाला आहे. जे गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे दहशतीखाली राहून दबून गेले होते, ते आता निर्भयपणे पुढे येत आहेत. पोलिस कारवाईनंतर गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून “आता गप्प बसणार नाही” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. माध्यमांसमोर बोलायला पूर्वी घाबरणारे लोक आता खरातचे कथित काळे कारनामे उघड करत आहेत.गावकऱ्यांनी अशोक खरातला गावबंदी करण्याचा ठराव ग्रामसभेत मांडण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच खरात अध्यक्ष असलेल्या ईशान्यश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कारभार ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणीही जोरात होत आहे.Ashok Kharat Nashik  येत्या काही दिवसात देवस्थानाचा कारभार ग्रामस्थांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप अधिक वाढला आहे. ग्रामसभा तात्काळ बोलावून योग्य निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. भोंदूबाबाच्या अटकेनंतर मिरगावमध्ये भीतीचे सावट दूर होऊन संतापाचा उद्रेक होताना दिसत आहे. आता ग्रामसभेत कोणते निर्णय घेतले जातात आणि प्रशासन त्यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.