उभरते सितारे कार्यक्रमात नवचैतन्याचा जागर

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Rising Stars program हिंदी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुलांचा विकास सामाजिक, मानसिक, शारीरिक, वर्तनात्मक आणि भावनिक पातळीवर होणे आवश्यक असून, त्यांच्या आहारात कॅल्शियम व लोखंडाची कमतरता दूर करण्यासाठी पालकांनी घरच्या जेवणावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.
 
 
Rising Stars program
 
न्यूक्लिअर कुटुंब पद्धतीमुळे घरातील संवाद आणि संस्कारांमध्ये बदल होत आहेत. घर हे केवळ सजावटीचे ठिकाण नसून, जिथे मनाला शांती मिळते आणि सर्वांना मोकळेपणाने व्यक्त होता येते, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. Rising Stars program मुलांना वेळ देऊन त्यांच्यावर संस्कार रुजवणे, प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्त्व जपणे महत्त्वाचे आहे, असे मत डॉ. तक्षशिला ताकसांडे यांनी व्यक्त केले.
 
विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या वतीने नवोदित प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘उभरते सितारे’ हा उपक्रम हिंदी मोर भवनच्या उत्कर्ष हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. ‘नव चैतन्य’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात शिक्षणप्रद, ज्ञानवर्धक आणि संगीतमय सादरीकरणे झाली. Rising Stars program कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून युनिसेफ आणि डब्ल्यूएचओशी संलग्न सुप्रसिद्ध एमडी डॉ. तक्षशिला ताकसांडे उपस्थित होत्या. आयोजक युवराज चौधरी आणि सहआयोजिका वैशाली मदारे यांनी त्यांचा स्वागत वस्त्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. यानंतर उपस्थित मुलांनी ‘नव चैतन्य’ या विषयावर आपले विचार मांडले तसेच गाणी आणि नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. आदित मिंज, मृणाल तेलराडे, निर्भय लाकुडकर, सागर नंदपूरकर, स्वरा भूतडा, आराध्या पुरी आणि दोर्फी जनबंधू यांनी उत्कृष्ट गायन सादर केले. मृणाल तेलराडे यांनी हार्मोनियम वादन केले, तर संपूर्णा रेमंडल यांच्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
 
 
कार्यक्रमाला पालकांसह मोनिका रेमंडल, प्रा. डॉ. शालिनी तेलराडे, डॉ. रोमन जनबंधू, डॉ. प्रकाश ऊके, अरुण खोब्रागडे, माधुरी जनबंधू, सरिता लाकुडकर, धनंजय नंदपूरकर, मिनाक्षी केसरवानी, सुदेश मेंढे, संध्या नंदपूरकर, मयंक भूतडा, रीना मनोज पुरी, ज्योती खोब्रागडे, जयंत जोशी, गीता सुरेश मिंज आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत शंभरकर यांनी सहकार्य केले. Rising Stars program कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहआयोजिका वैशाली मदारे यांनी केले. शेवटी आयोजक युवराज चौधरी यांनी उपस्थित सर्व कलाकार, प्रेक्षक आणि मुलांचे आभार मानले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र