अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपद निर्मितीबाबत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
आ. बाबुराव कदम यांची

हदगाव, 
Baburao Kadam हदगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी स्वतंत्र न्यायाधीशपद निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. गुरुवार, १२ मार्च रोजी दुपारी मुंबई मंत्रालयात ही बैठक घेण्यात आली. ही बैठक राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत झाली.  बैठकीत हदगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीशपद लवकरात लवकर निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी आणि गतिमान व्हावे यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय प्रकि‘या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळाली.
 

hadgav 
 
हदगाव तालुका व परिसरातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी सध्या अनेकदा दूरवर जावे लागत असल्याने न्यायालयीन स्थानिक स्तरावर अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपद निर्माण झाल्यास न्यायालयीन कामकाजाचा वेग वाढण्यास मदत होईल तसेच प्रलंबित प्रकरणांच्या निकाली प्रकि‘येलाही गती मिळेल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
 
 
या बैठकीस आमदार Baburao Kadam बाबुराव कदम, शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी हदगाव परिसरातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळविण्याची प्रकि‘या सुलभ करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या बैठकीमुळे हदगाव येथे मंजूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेल्या न्यायाधीशपद निर्मितीची प्रकि‘या लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त जात आहे. स्थानिक नागरिक तसेच वकील वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून यामुळे न्यायव्यवस्था अधिक प्रभावी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.