पंजाबमध्ये कॅबिनेटमधील मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
चंदिगढ,
Cabinet ministers resign in Punjab पंजाबमध्ये एका गंभीर प्रकरणानंतर मोठी राजकीय हालचाल घडली असून, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कॅबिनेटमधील मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. लालजीत भुल्लर यांच्यावर वेअरहाऊसशी संबंधित एका अधिकाऱ्याला घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने आपल्यावर झालेल्या अपमानाबाबत एक धक्कादायक पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
 
 

resign in Punjab 
या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तातडीने भूमिका घेत तपास प्रक्रिया सुरू केली. निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी त्यांनी हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली तपास होऊ नये, यासाठी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणतीही व्यक्ती नियमांचे उल्लंघन करत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.