नवीन वर्षात सालगड्याने फोडली दोन लाखाला शेंडी!

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
किमान २२ पगारी रजाही नरेंद्र सुरकार
 
सिंदीरेल्वे, 
परवां, मराठी नववर्ष गुढी उभारून सुरू झाले. गुढीपाडव्याला नवीन Farmer : Sadgadi साडगडी ठेवण्याची परंपरा आहे. यंदा येथील ८५ एकराची शेती सांभाळणार्‍या बळीराजाकडे भारत नावाच्या सालगड्याला २ लाख ३० हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. त्यापैकी निम्मी रकम ‘जॉयनिंगला’च अदा केली, हे विशेष!
 
 
farmar
 
नवीन वर्ष तरी सुखाचे जावो, अशी आशा व आकांक्षा घेऊन सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शेतकरी राजा सज्ज झाला. वाढती महागाई आणि मजुरांची घटणारी संख्या बघून अवाढव्य शेतीचा व्याप बघता हा व्यवहार झाला. ज्या शेतकर्‍यांकडे बारमाही सिंचनाची सोय आहे तसेच अन्य शेतीपुरक व्यवसाय आहेत त्यांनाच हे शय आहे. सर्वसाधारण शेतकर्‍यांनी सरासरी १६ हजार रुपये प्रतिमाह पगाराने शेतमजूर (पुरुष) पके केले आहेत.
 
 
सततची नापिकी, अतिवृष्टी, अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत आपला उदरनिर्वाह करणारा शेतकरी अनेक संकटाना तोंड देत आहे. कर्जाची परतफेड करून घरखर्च कसा चालवावा या विवंचनेत राहणारा शेतकरी पर्याय नसल्याचे बघून थेट शेती ठेकत्याने लावून मोकळा होताना दिसतो. दुसरीकडे २४ तासांची बांधिलकी नको समजून अनेक सालगड्यांनी आता शेतमजूर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
Farmer : Sadgadi गुढीपाडव्याच्या दिवशी जुन्या सालगड्याच्या हस्ते मांडवाला, घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधून घरासमोर गुढी उभारून त्याचा वर्ष भराचा हिशोब चुकता केला जातो. दिवसा नवीन व्यवहार ठरला की नव्या सालगड्याच्या हाताने सायंकाळी शेतात नवा गडी दाळ पानाचा कार्यक्रम करुन आपला परिचय देतो. सततच्या नापिकीमुळे नववर्षात अनेकांनी शेतीपुरक व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. नोकरपेशा शेतकर्‍यांच्या अविचाराने सालगड्यांचे तसेच मजुरांचे भाव वाढलेत, असाही मतप्रवाह आहे. ज्यांना शेती परवडत नाही त्यांनी कोरडवाहू शेती १२ हजार रुपये एकरी किंवा सिंचनाची सोय असल्यास २५ हजार रुपये दराने ठेयाने दिली. शेतीला सुगीचे दिवस यावेत म्हणून केंद्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये देत आहे. परंतु, सर्व बाजूंचा विचार करता शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे.
मोफत धान्याचा परिणाम
Farmer : Sadgadi काही वर्षापूर्वी ६ कुडव धान्य व रकम असे एका वर्षाची मजुरी दिली जात होती. आता सरकारकडून मोफत धान्य मिळत असल्याने ऐतखाऊंची संख्या वाढली आहे. त्यामुळे सालगडी किंवा शेतमजूर मिळणे कठीण झाले असल्याची प्रतिक्रिया भोसा(गौळ) येथील शेतकरी रमेश नागमोते यांनी सांगितले.