गुढी पाडवा व डॉ. हेडगेवार जयंती उत्साहात साजरी

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
नागपूर,
Gudi Padwa सावित्रीबाई फुले नागरी सहकारी प्रत्यय संस्था आणि हनुमान नगर नागरिकांच्या वतीने वर्षप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर गृहिणी समाज सभागृहाच्या प्रांगणात पारंपरिक गुढीची उत्साहात उभारणी करण्यात आली. याच शुभमुहूर्तावर प्रखर देशभक्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची १३७ वी जयंतीही साजरी करण्यात आली.
 
Gudi Padwa
 
यावेळी हनुमान नगरातील उद्योजक व समाजसेवक रवींद्र नामदेवराव जवंजाळ व किरण जवंजाळ, तसेच सावित्रीबाई फुले प्रत्यय सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पहाडे, नगर संघचालक ज्ञानेश्वरजी बालपांडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश हरकरे, राजेशजी बजाज आणि जेष्ठ नागरिक मंडळ हनुमान नगरचे सचिव मोहन झरकर यांच्या हस्ते गुढीपूजन व डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांना नववर्ष व नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. Gudi Padwa कार्यक्रमाला प्रभाग ३१ चे नगरसेवक गणेश चार्लेवर, चंद्रकांत खंगार, मंगला मस्के, मानसी शिमले, संस्थेचे कोषाध्यक्ष प्रवीण पांडे, सुनील तायडे, विजय नेरकर, पीयूष अग्रवाल, राजू पिदडी, रवींद्र सोनार तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश गभणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेच्या उपाध्यक्ष शारदा क्षत्रिय यांनी केले.
सौजन्य: संदीप तिजारे, संपर्क मित्र