1 एप्रिलपासून आयकरासंबंधी मोठे बदल

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Income Tax Rules 2026 केंद्र सरकारने आयकर नियम 2026 अधिसूचित केले असून हे नियम 1 एप्रिलपासून लागू होतील. या नव्या नियमांमुळे कररचनेतील गुंतागुंत दूर होण्यास मदत होईल आणि नागरिकांना आयकर भरताना सोपेपणा अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे. नवीन कायदा, इनकम टॅक्स ॲक्ट 1961 ची जागा घेईल आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम थेट दिसून येईल.
 

Income Tax Rules 2026 
सरकारचा उद्देश कर प्रणाली अधिक पारदर्शक करणे आणि करदात्यांमध्ये असलेला संभ्रम व भीती दूर करणे हा आहे. नवीन नियमांनुसार व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांचा तपास, त्याचा लेखाजोखा आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होईल. यामुळे कर रचनेत सहजता येईल आणि कर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, असा अंदाज आहे.विशेषतः डिजिटल व ऑनलाईन कंपन्यांवर हा बदल थेट परिणाम करणार आहे. काही भारतीय कंपन्या परदेशातील स्टार्टअप्ससह भागीदारी करून भारताबाहेर सेटअप उभारून भारतात सेवा पुरवत होत्या, ज्यामुळे त्या कराच्या परिघात येत नव्हत्या. आता या कंपन्यांची भारतातून होणारी कमाई कराच्या परिघात येईल. ऑनलाईन सेवा, ॲप्स किंवा डिजिटल उत्पादनं पुरवणाऱ्या कंपन्यांवर भारतात कार्यालय नसतानाही कर लादला जाईल.
शेअर बाजारातील Income Tax Rules 2026 व्यवहारांवरही करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शेअर खरेदी-विक्री (trades) यांचे ऑडिट रेकॉर्ड सात वर्षांपर्यंत जतन करणे अनिवार्य केले गेले आहे. बाजारातील कोणताही बदल सरकारला नियमितपणे कळवावा लागेल, ज्यामुळे शेअर बाजार अधिक पारदर्शक बनेल.नवीन कायद्याचा कर्मचारी वेतनावरही परिणाम होईल. घरभाडे शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून करमुक्त असेल, तर मोफत जेवण फक्त 200 रुपये प्रति जेवण करमुक्त राहील. याशिवाय, 15,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याची भेटवस्तू करपात्र ठरेल. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या पगार पत्रकात बदल अपेक्षित आहेत.सरकारच्या या निर्णयामुळे आयकर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, डिजिटल व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि अर्थव्यवस्थेतील तपासणी व लेखाजोखा अधिक प्रभावीपणे होईल, अशी अर्थतज्ज्ञांची मते आहेत.