वेध
विजय कुळकर्णी
agricultural land रासायनिक खतांचा अतिवापर व विविध प्रकारच्या कीटक व रोगनाशकांची पिकांवर केली जाणारी फवारणी यामुळे दिवसेंदिवस शेतजमिनीचा पोत (कस) कमी होत आहे. शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. आपल्या जमिनीला कोणती द्रव्ये आवश्यक आहेत, याबाबत जाणून न घेताच एकाने अमुक खत दिले म्हणून आपणही दिले पाहिजे, असा विचार करून रासायनिक खतांचा अतिवापर केला जात आहे. पिकांवर आलेल्या विविध रोग व कीड नियंत्रणासाठी विविध प्रकारची रासायनिक औषधी फवारली जात आहेत. त्यामुळे अन्नधान्यात अजाणतेपणी विष मिसळले जात आहेच; शिवाय आपल्या शेतजमिनीचा पोत म्हणजे कसदारपणादेखील आपण आपल्याच हाताने कमी करीत आहोत. त्यामुळे जमिनीचा सुपीकपणा जाऊन ती काळी भुसभुशीत जमीन पडीक होण्याच्या स्थितीकडे जात आहे. तेव्हा, शेतजमिनीचा पोत कायम राखणे आज अतिशय आवश्यक झाले आहे. पूर्वी जवळपास सर्वच शेतकèयांकडे गायी-म्हशी असायच्या. किमान एक बैलजोडी तर असायचीच. त्यामुळे दरवर्षी शेतात घरचे शेणखत टाकले जात होते. शेणखत मिळाल्यामुळे जमिनीला आवश्यक ती सर्व घटकद्रव्ये मिळत होती. ती मिळाल्याने रासायनिक खतांचा वापर अभावानेच केला जात होता. आज शेतकèयांकडील गायी-म्हशींची संख्या फारच कमी झाली आहे. नसल्यातच जमा आहे.
बैलजोड्याही फार कमी कास्तकारांकडे आहेत. शेतीची जवळपास सर्वच कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. तसेच, पीक पद्धतीत बदल झाल्याने चाऱ्याचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी किंवा गायी-म्हशी ठेवत नाहीत. परिणामी शेणखत शेतात टाकले जात नाही. याचा परिणाम जमिनीचा कसदारपणा कमी होण्यावर झाला आहे.
सध्या बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती हा उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील धरणांचे खोलीकरण करण्याचे काम केले जात आहे. धरण खोलीकरणातून निघालेला गाळ शेतकèयांना मोफत त्यांच्या शेतात टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नदीकाठच्या गावातील शेतकèयांनी लोकसहभागातून नदीपात्राचे खोलीकरण करून त्यातील गाळ ट्रॅक्टरने आपआपल्या शेतात टाकणे सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी धरणातील गाळ आपल्या शेतात टाकला त्यांची शेती गाळयुक्त होणार आहे. गाळाची शेती झाल्याने तिची सुपीकता वाढून उत्पादनातही वाढ होणारच आहे. लोकसहभागातून हे काम केले जात असल्याने शासनाचा या कामावरील खर्च वाचला आहे. तसेच, शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळाल्याने त्यांची शेती सुपीक होणार आहे. तर, नदीपात्राचे खोलीकरण झाल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. पात्र खोल झाल्याने धरणात जास्त दिवस पाणी राहणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. धरणातील जलसाठा वाढल्याने आसपासच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे विंधन विहिरी, विहिरी इत्यादी जलस्रोतातील जलस्तरात वाढ होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यासोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी खरिपासोबतच रबीची पिके घेऊ शकणार आहे. पाणी उपलब्ध झाल्याने फळबाग लागवड करता येणार आहे. याचा शेतकèयांना मोठा फायदा होणार आहे. सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी खरिपाच्या पिकांसोबत गहू, हरभरा, लिंबू लागवड व इतर फळबाग लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना तीन ते चार पिके सहज घेता येतील. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होणार आहे. एवढे फायदे हे या उपक्रमामुळे होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील भोगावती नदीवर सिंदी-साखरखेर्डा आणि सवडद येथे केटीवेअर तयार केले आहेत. त्यामुळे किमान आठ महिने या नदीत पाणी साठून राहते. या नदीपात्रात प्रचंड गाळ साचला होता.agricultural land हा गाळ शेतीसाठी उपयुक्त असून रासायनिक खतापेक्षा पिकांसाठी पोषक आहे. हे ओळखून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नदीतील गाळ उपसून शेतात टाकण्याचे काम सुरू केले आहे. सिंदीचे सरपंच अशोक खरात यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा बुलढाणा पॅटर्न इतर जिल्ह्यातही राबविला गेल्यास नदीपात्रांचे खोलीकरण करण्यास शासनाला एक रुपयाही खर्च येणार नाही. शेतकऱ्यांना त्यांची शेती गाळयुक्त झाल्याने रासायनिक खतांवरील खर्च टाळून बचत करता येईल. तसेच, उत्पादन वाढल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाही वाढ होईल, हे नक्की. तेव्हा शासनाने महाराष्ट्रात हा उपक्रम राबवावा, असे वाटते.
8806006149