अहिरवाड्याच्या जगदंबा भवानी माता मंदिराचा होणार कायापालट

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
आ. सुमित वानखेडे यांच्या हस्ते दीड कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
 
आर्वी, 
Jagdamba Bhavani Mata Mandir विदर्भातील भाविकांचे कुलदैवत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिरवाडा येथील स्वयंभू भवानी माता मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी आणि सौंदर्यीकरणासाठी आ. सुमित वानखेडे यांनी पुढाकार घेतला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर १ कोटी ५२ लाख रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन आ. वानखेडे यांच्या हस्ते झाले.
 
 
bhumipoojan
 
Jagdamba Bhavani Mata Mandir निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे बाकळी नदीकाठी असलेल्या या प्राचीन मंदिराला भविष्यात धोका निर्माण होऊ नये, यासाठी आ. वानखेडे यांनी विशेष निधी मंजूर करून आणला. यामध्ये ७१ लाख १३ हजार ६०१ रुपयांच्या संरक्षक भिंत बांधकाम व सौंदर्यीकरण तर दुसर्‍या टप्प्यातील ८१ लाख ५३ हजार ६६४ रुपयांच्या संरक्षक भिंत बांधकामाचा समावेश आहे. राजा भीमकाच्या काळातील मानले जाणारे हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नसून एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. या विकासकामामुळे केवळ मंदिराचे जतन होणार नाही तर मंदिर परिसरात होणार्‍या सौंदर्यीकरणामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन आ. वानखेडे यांनी यावेळी केले.