मुंबई-गोवा महामार्ग रोखणार : राजू शेट्टी यांचा चक्का जामचा निर्धार

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
मुंबई/कोकण:
Raju Shetti 23 मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन होणार आहे, अशी स्पष्ट माहिती तळ कोकणातील शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. 12 मार्च रोजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तळ कोकणातील बागायतदारांनी मोर्चा काढला होता, मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे ते म्हणाले.
 

Raju Shetti  
शेतकऱ्यांनी सरकारकडे ठामपणे मागणी मांडली होती, मात्र 10 दिवस उलटूनही कोणताही निर्णय न झाल्यामुळे नांदगाव तिठयावर रास्तारोको आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या Raju Shetti नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मार्ग मोकळा होणार नाही.या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी तयारी करत आहेत, तसेच प्रवाशांना सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.