एक धड दोन डोकी असलेले नवजात बघताच आईचा मृत्यू

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
अलीगढ,
Newborn with one body and two heads उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे घडलेल्या एका दुर्मीळ आणि हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ससनी गेट परिसरातील एका महिलेने प्रसूतीदरम्यान एकमेकांना जोडलेल्या जुळ्या बाळांना जन्म दिला, मात्र या घटनेचा तीव्र धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा महिला रुग्णालयात ही प्रसूती झाली. जन्मलेल्या जुळ्या बालकांना एकच शरीर असून त्यांची डोकी वेगवेगळी आहेत, तसेच हातपाय स्वतंत्र असले तरी ते एकमेकांना जोडलेले आहेत. अशा प्रकारचा दुर्मीळ प्रसंग पाहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
 
 
 
heads aligarh
प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, जन्मलेल्या जुळ्या बालकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या पुढील उपचारासाठी आणि आवश्यक शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून विशेष लक्ष दिले जात आहे.