पाच तासांच्या रेस्क्यूनंतर प्राण वाचवले

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
पुणे
Dr. Prashant Nandvate पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर एक धक्कादायक घटना घडली. खेडशिवापूर येथील खाजगी रुग्णालयात रुग्ण पाहण्यासाठी निघालेले डॉ. प्रशांत नंदवते (वय 40, मधुबन सोसायटी, कोल्हेवाडी) पाय घसरल्याने 350 फूट खोल दरीत कोसळले. ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास चिलीमचा खड्डा या पॉईंटजवळ घडली.
 

Pune rescue, Singhagad fort accident, Dr. Prashant Nandvate rescue 
घटनेनंतर डॉ. नंदवते सावध Dr. Prashant Nandvate  राहून 112 वर कॉल केला. माहिती मिळताच हवेली पोलीस स्टेशनचे हवालदार समाधान चोरमले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, वैभव भोसले, संतोष जाधव यांच्यासह वनसंरक्षक समितीचे कैलास जरांडे घटनास्थळी दाखल झाले.रेस्क्यू ऑपरेशन अंधारात राबवावे लागले. आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले दरीत उतरले तर इतर सहकारी वरच्या बाजूला थांबले. दोराच्या साहाय्याने त्यांनी डॉ. नंदवते यांना खोल दरीतून बाहेर काढले. रात्रीच्या अंधारात डोंगराचे अवघड चढ उतार पार करत आणि बॅटरीच्या प्रकाशात बचाव मोहीम यशस्वी झाली.सध्या डॉ. नंदवते यांची प्रकृती स्थिर असून त्यांना फक्त काही खरचटलेले दुखणे आहे. या धाडसी रेस्क्यूसाठी हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.या घटनेतून असे स्पष्ट होते की, डोंगर रस्त्यांवर योग्य खबरदारी घेतल्याशिवाय चालणे किती धोकादायक ठरू शकते. यावेळी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे जीव वाचवण्यात आला.