चर्चा सोन्याच्या हंड्याची, निघाले पितळ, तांबे

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
घराच्या खोदकामात सापडले पुरातन भांडे

अमोल सांगानी
राळेगाव, 
Ralegaon: Ancient utensils खोदकाम करताना अनेक रहस्यमयी गोष्टी मानवाला कधी-कधी मिळाल्या आहेत. जमिनीच्या आत अशी अनेक रहस्ये आतापर्यंत सापडली आहेत. अशीच एक घटना तालुक्यातील पिंपळापूर येथे शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. मात्र चर्चा सोन्याच्या हंड्याची होती. तर प्रत्यक्षात खोदकामात पितळ आणि तांब्याची भांडी निघाली. या घटनेची चांगलीच चर्चा वडकी परिसरात रंगली आहे. घराचे खोदकाम करत असलेल्या मजुराला खड्ड्यामध्ये पितळ आणि तांब्याचे अनेक प्रकारचे भांडे सापडले आहेत. त्यामुळे हा हंडा होता की काय अशा चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे.
 
 
puratan
 
Ralegaon: Ancient utensils तालुक्यातील पिंपळापुर येथील प्रमोद संतोष कार्लेकर यांना घरकुल मिळाल्यामुळे त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते. घराच्या बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम खडकी येथील काही मजुराला दिले होते. खड्डे खोदकाम करताना करत असताना अचानक मजुराला मातीत गाडलेले जुने पितळ आणि तांब्याचे सापडले. नेमका हा सोन्याचा हंडा तर नव्हता, अशी चर्चा परिसरात वार्‍यासारखी पसरली. मोठ्या सं‘येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच वडकी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमिनीत अनेक प्रकारचे छोटे-मोठे पितळ-तांब्याचे भांडे आढळून आले. या सर्व वस्तूंचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व जमिनीतून मिळालेल्या सर्व वस्तू हस्तगत आल्या. या घटनेचा अधिक तपास वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरखडे करीत आहेत.
हंडा सोन्याचा नाही
पिंपळापूर गावामध्ये जमिनीतून सोन्याचा हंडा निघाला याची चर्चा सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. आमच्या गावात असे काही घडले नाही. घराचे खोदकाम करताना जे हांडे सापडले ते तांब्याचे आणि पितळेचे आहे. त्या हंड्यामध्ये सोने काहीच नाही. फक्त या गोष्टीची चर्चा झाली आहे. आम्ही गावकर्‍यांनी ही माहिती वडकी पोलिसांना दिली आणि त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामासुद्धा केला आहे. फक्त तांबे आणि पितळी भांडे सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी उलटसुलट चर्चेवर विश्वास ठेवू नये.
रवींद्र चौधरी
सरपंच, पिंपळापूर ग्रामपंचायत