अनिल कांबळे
नागपूर,
teacher recruitment fraud अल्पसंख्याक शिक्षण संस्थेत 100 टक्के शासन अनुदानित तत्त्वावर कायमस्वरूपी नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षकाला तब्बल 45 लाख 50 हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार पाचपावलीत उघडकीस आला. या प्रकरणी पाेलिसांनी शिक्षण संस्थेच्या संस्थापकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहीन अफशा शेख (41, लष्करीबाग) त्यांचा भाऊ शेख इरशाद आणि बहीण अमरीन अफशा यांना आराेपींनी विश्वासात घेतले हाेते. आराेपींनी सांगितले की, अल्पसंख्याक छप्परबंद मुस्लिम शिक्षक संस्था (पापडा बु., ता. साकाेली, जि. भंडारा) द्वारा संचालित शाळेत कायमस्वरूपी नाेकरी लावून दिली जाईल. प्रत्यक्षात या शाळेला शासनाकडून काेणतेही अनुदान प्राप्त नव्हते, तरीही 100 टक्के अनुदान मिळाल्याचे खाेटे आमिष दाखवून आराेपींनी फरहीन अफशा यांना त्यांचे नातेवाईक आणि सहकाèयांकडून वेळाेवेळी 45 लाख 50 हजार रुपये वसूल केले. रक्कम घेऊनही फरहीन अफशा व इतरांना काेणताही पगार दिला गेला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फरहीन अफशा यांनी 17 मार्च राेजी पाचपावली पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवली.teacher recruitment fraud प्राथमिक चाैकशीनंतर पाेलिसांनी लतीफ पठाण (संस्थापक), आरीफ लतीफ पठाण (अध्यक्ष), निखत अफराेज माेहम्मद अफजल (मुख्याध्यापिका), माेहम्मद अफजल, राहील अमरीन कुरेशी (सचिव) आणि अब्दुल गफफ्ार सत्तार कुरेशी या सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार बाबुराव राऊत यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक युनूस शेख करीत आहेत.
अनेक शिक्षकांची फसवणूक
आराेपी संस्थासंचालक,सचिव आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे अनेक उच्चशिक्षित बेराेजगारांना फसवल्याची शंका आहे. परिणामी, पाेलिसांनी जर यातील काेणत्याही आराेपीने काेणालाही नाेकरीचे आमिष दाखवून फसवले असेल, तर त्यांनी संबंधित कागदपत्रांसह पाचपावली पाेलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहावे किंवा पाेलिस निरीक्षक युनुस शेख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार बाबुराव राऊत यांनी केले आहे.