शेजार्‍यांनी सात वर्षीय मुलीचे अपहरण करून केला खून

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
दारव्हा, 
तालुक्यातील बोथ या पहिल्या वर्गात शिकणारी ७ वर्षीय Shivani Jadhav शिवानी पंकज जाधव ही मुलगी शुक‘वार, २० मार्च रोजी दुपारी ४ वाजल्यापासून बेपत्ता झाल्याचे बातमी परिसरात पसरली. घरच्यांनी व गावातील नागरिकांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली. पण मुलगी न सापडल्याने अखेर जाधव परिवाराने दारव्हा पोलिसांना कळविले. पोलिसांनी रात्रभर शोध घेऊनही मुलीचा शोध लागला नाही. शनिवार, मार्च रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता येथे येऊन धडकले. त्यांच्यासह श्वानपथकाने शोध घेतला असता श्वान शेजारच्या घरासमोर जाऊन उभा राहत होता.
 

shiwani 
 
Shivani Jadhav शेजारच्या त्या घराची तपासणी केली असता घरात मुलीचा मृतदेह आढळून आला. संबंधित ४० वर्षीय आरोपी सोनू विलास जाधव या अपहरणकर्त्याचा शोध पोलिस घेत आहेत. हे अपहरण नेमके हत्या कशासाठी, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. पोलिसांनी या शेजारच्या घरातील ५ व्यक्तींना आरोपी केले असून काही प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत असल्याची माहिती आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेने परिसर मात्र हादरून गेला आहे.