संतापजनक! उंदीर मारण्याचे औषध टाकून 7 भटक्या श्वानांची हत्या

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
डोंबिवली
Stray dog poisoning डोंबिवलीतील धामटण गावाजवळील एका भटक्या कुत्र्यांच्या गंभीर मृत्यूप्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. उंदीर मारण्याच्या विषारी औषधामुळे सात भटक्या कुत्र्यांचा जीव गेला असून, या घटनेत एकलव्य अॅनिमल्स पेडिग्री कंपनीचे मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि काही कामगार यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कुत्र्यांचे शव पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
 

Stray dog poisoning  
तक्रारीनुसार, सुचित्रा किशोर सुर्वे या सामाजिक कार्यकर्त्या आणि प्राणीप्रेमी गेल्या दोन वर्षांपासून धामटण गावातील एका कारखान्याजवळ भटक्या कुत्र्यांना अन्न देत आहेत. त्यांच्याविरुद्ध कंपनीतील आरोपींनी 12 मार्चपासून परिसरात उंदीर मारण्याची विषारी पावडर टाकण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सुरुवातीला चार आणि त्यानंतर आणखी तीन अशा एकूण सात कुत्र्यांचा मृत्यू झाला. तक्रारीत असेही म्हटले आहे की, याआधीही अशाच पद्धतीने एकूण 36 भटकी व पाळीव कुत्र्यांचा मृत्यू झाला होता.तक्रारीत आरोपींनी पाळीव कुत्र्यांवरही हिंसक कारवाई करण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे. सुर्वे आणि त्यांच्या पतीलाही जीव घेण्याची धमकी मिळाल्याचे आरोप तक्रारीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काळ्याण-डोंबिवली Stray dog poisoning महानगरपालिका हद्दीत सुमारे 90 हजार भटकी कुत्री असल्याची नोंद असून, प्राणी संरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पोलिसांनी मृत कुत्र्यांचे पोस्टमॉर्टम करून अहवालानुसार कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्राणी संरक्षणाविषयी चिंता वाढली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना भटक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता भासते.