पलटलेल्या ट्रॅक्टरखाली दबून मुलाचा मृत्यू

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
कारेगाव येथील घटना

राळेगाव, 
Tractor accident ट्रॅक्टर पलटल्याने एका १५ वर्षीय मुलाचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीषण घटना राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे शुक‘वार, २० मार्च रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. अंश श्रीराम कोडापे (वय १५) असे मृतक मुलाचे नाव आहे. या वडकी पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Tractor accident 
 
प्राप्त माहितीनुसार, अंश कोडापे हा गावातील नंदुरकर यांच्या ट्रॅक्टरवर बसून मित्रासोबत जात असताना यातील Tractor accident ट्रॅक्टरचालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवल्याने अचानक रस्त्याच्या वळणावर ट्रॅक्टर पलटला. या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली दबून अंशचा जागीच मृत्यू झाला. मुलाचा ट्रॅक्टरखाली मृतदेह आईवडिलांनी हंबरडा फोडला. गावातील नागरिकांनी तातडीने ट्रॅक्टर बाजूला करून मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी राळेगावच्या ग‘ामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी मृतक अंशची आई सीमा श्रीराम कोडापे यांच्या तक‘ारीवरून वडकी पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टरचालक समीर राजू नंदुरकर (वय २२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे आहेत.