शेतमजुरांच्या ऑटोला भीषण अपघात

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
१४ महिला जखमी
भरधाव ट्रकने मोटरसायकल व ऑटोला उडवले

उमरखेड, 
Truck, motorcycle and auto accident पोटाची खळगी भरण्यासाठी हळद काढण्यासाठी शेतात जाणार्‍या शेतमजुरांच्या अ‍ॅटोला मागून भरधाव येणार्‍या आयशरने धडक दिली. त्या अगोदर एका मोटरसायकल स्वारासदेखील धडक दिली यामध्ये अ‍ॅटोचालक, मोटरसायकल स्वार व ५ महिला असे ७ जण गंभीर, तर ९ जण जखमी झाल्याची घटना उमरखेड ढाणकी रस्त्यावर एमआयडीसीजवळ घडली. या घटनेतील ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात आहे. शनिवार, २१ मार्चला सकाळी ९ च्या सुमारास तालुक्यातील विडूळ येथे हळद काढण्यासाठी उमरखेड येथील १४ महिला मजूर अ‍ॅटोने उमरखेड वरून जात होते. ढाणकी रस्त्यावर एमआयडीसीजवळ मागून भरधाव येणार्‍या आयचरने प्रथम मोटरसायकलला धडक दिली.
 

acc  
 
Truck, motorcycle and auto accident त्यानंतर समोरच्या शेतमजुर असलेल्या अ‍ॅटोला जबर धडक दिल्यानंतर ट्रकचालकाला उपस्थित लोकांनी चोप दिला. नागरिकांचा संताप ट्रकचालक गाडी घेऊन पळून जात असताना विडूळकरांनी त्याला अडविले व पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत मोटरसायकलस्वार लक्ष्मण किसन गायकवाड, जिजा विठ्ठल धुळेकर, वर्षा सुरेश गायकवाड, लक्ष्मी जयराम दिवेकर, सुनीता मुकेश दिवेकर, लता प्रभाकर शिंदे, अर्चना नितीन जगदाळे (सर्व उमरखेड) यांना गंभीर जखमी झाल्याने नांदेड व वर्धा येथील रुग्णालयात पाठविण्यात तर अ‍ॅटोचालक गजानन हिरामन हांडे, प्रतिभा गजानन जाधव, संगीता गणेश जेरे, माया सिद्धार्थ गावंडे, रश्मी राजू दिवेकर, शीला संजय दिवेकर, धुरपता पंजाब दवणे, सारिका ईश्वर जगताप, विद्या दिगांबर इंगोले या जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव व जमादार अमित नोळे यांनी जाऊन जखमींना रुग्णालयात पाठवले. ट्रकचालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.