बुलढाणा
Buldhana पाण्याविषयी जाणीव जागृती करण्यात येते. जलपूजन, जल प्रतिज्ञा घेऊन पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. दि. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातही सर्व ग्रामपंचायत, सर्व पंचायत समिती यांनी आपल्या स्तरावर जलदिन साजरा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा गुलाब खरात यांनी दिले आहेत.

Buldhana २२ मार्च रोजी जगभर जागतिक जलदिन साजरा केला जातो. या दिवशी जल शपथ घेऊन, जलपूजन करून पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिनांक ८ मार्च ते २२ मार्च दरम्यान जल महोत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्याची सांगता जागतिक जलदिनाने म्हणजेच २२ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विविध उपक्रम बुलढाणा जिल्ह्यातही राबविण्यात आले आहेत. यामध्ये जल अर्पण दिवस साजरा करण्यात आले आहेत. ११ मार्च रोजी जागतिक प्लंबर दिनानिमित्त प्लंबर यांचा सत्कार करण्यात आला आहे. ऋढघ द्वारे पाणी तपासण्याचे प्रात्यक्षिक गावागावात दाखवण्यात आले आहे आणि २२ मार्च रोजी या अभियानाची सांगता होत असून त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सर्वच ग्रामपंचायतीमध्ये, सर्वच पंचायत समिती स्तरावर जागतिक जलदिन साजरा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा गुलाब खरात यांनी दिले आहेत. यामध्ये जल पूजन, जल प्रतिज्ञा घ्यायची आहे. Buldhana या कार्यक्रमाला संबंधित गावातील सर्व गावकरी, महिला, युवक यांना आमंत्रित करायचे आहे. आणि पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी दिले आहेत. या उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन सतीश देशमुख प्रकल्प संचालक जल जीवन मिशन, जिल्हा परिषद बुलढाणा, अनिल चव्हाण कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले आहे.