शिक्षकांच्या मागणीला शिक्षणाधिकार्‍यांचा नकार

    दिनांक :21-Mar-2026
Total Views |
प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल नाही
 
अमरावती, 
Zilla Parishad Amravati प्राथमिक शाळेची सकाळची ७.१५ ते १२.१५ ची वेळ वाढते उन्ह पाहता ७ ते ११ अशी करावी, या शिक्षक संघटनांच्या मागणीला शिक्षणाधिकार्‍यांनी नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना २० मार्चला निवेदन सादर कडून सकाळच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली. २० मार्चपासून सकाळ सत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत व शाळेची वेळ ही ७.१५ ते १२.१५ अशी ठरविण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील उष्णतेचे प्रमाण पाहता व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता आणि बाहेर गावावरून शाळेत येणारी मुले यांच्याकरिता सकाळ शाळेतील वेळेत बदल करून ती वेळ ७ ते ११ अशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
 
 
Zilla Parishad Amravati
 
Zilla Parishad Amravati जिल्ह्यातील प्राथमिक शाळा २० मार्चपासून तर माध्यमिक शाळा १६ मार्चपासून सकाळ पाळीत सुरू झाल्या; पण शाळेच्या वेळेत प्राथमिक व माध्यमिक शाळेत तफावत आहे. माध्यमिक शाळा सकाळी ७ ते११ वाजेपर्यंत भरत आहे तर लहान मुलांची प्राथमिक शाळा ७.१५ ते१२.१५ भरत आहे. विविध शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांना याबाबत निवेदने दिली, पण प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळ बदलविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उष्माघातामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला काही घडले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न शिक्षक,पालक विचारत आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
(एएम २१ एमआर - बदल : शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा करताना संघटनेचे नेते)