मुंबई
Bhoot Bangla movie बहुप्रतीक्षित ‘भूत बंगला’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस उत्साह वाढताना दिसत आहे. चित्रपटाचे गाणे आणि झलक प्रसिद्ध झाल्यानंतर या कौटुंबिक विनोदी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांनी लोकप्रिय मालिका नागिन ७च्या सेटला भेट देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
मालिकेच्या सध्या सुरू असलेल्या भागात अक्षय कुमार यांनी ‘महानाग’ ही विशेष भूमिका साकारत नागिनला मार्गदर्शन करताना दिसले. ‘नागिन ७’च्या संपूर्ण पथकाकडून दोन्ही कलाकारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हा प्रसंग पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता Bhoot Bangla movie होती. सध्या ‘नागिन ७’ ही मालिका कथानकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून प्रेक्षकांकडून तिला मोठा प्रतिसाद मिळत आहे. निर्माती एकता कपूर यांच्या या लोकप्रिय मालिकेच्या सातव्या भागात अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी प्रमुख भूमिकेत झळकत आहे.
दरम्यान, ‘भूत बंगला’ या चित्रपटातून अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची बहुचर्चित जोडी पुन्हा एकत्र येत आहे. या जोडीने यापूर्वी अनेक गाजलेले विनोदी चित्रपट दिले असून, त्यांच्या खास शैलीमुळे प्रेक्षकांना या नव्या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.