भाजपा पथकात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता
यवतमाळ,
Bengal Assembly Election बंगालमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संघटन व निवडणूक प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून काही पदाधिकार्यांची प्रवासी कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. यामधे युवा मोर्चाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांचे संघटनात्मक व निवडणूक नियोजन विषयाचे कार्य लक्षात घेता त्यांना या पथकात संधी देण्यात आली आहे.
बंगाल निवडणुकीत पातळीवरून प्रत्येक राज्यातून निवडणूक नियोजनासाठी कार्यकर्त्यांना पाठविण्यात येते आहे. या पथकात महाराष्ट्रातून युवा मोर्चाच्या फक्त पाच पदाधिकार्यांची निवड झाली आहे. निवडणुकीदरम्यान हे सर्व कार्यकर्ते बंगालमध्ये राहून त्यांना जबाबदारी दिलेेल्या विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी, बूथ व्यवस्थापन, कार्यकर्त्यांशी संपर्क, नवीन कार्यकर्ते जोडणे, विविध पातळ्यांवर प्रचार यंत्रणा बळकट करणे, विशेष करून नवीन प्रचारात सहभागी करून घेणे आणि बंगालमध्ये भाजपाला विजय मिळवून देण्यास हातभार लावणे ही जबाबदारी पार पाडणार आहेत.
Bengal Assembly Election सूरज गुप्ता यांना बंगालमधील उत्तर बंग भागातील मालदा जिल्ह्यातील गाजोल विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी विविध निवडणुकांमध्ये अशी जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यांनी लोकसभेमध्ये मुंबई, श्रीवर्धन, अंमळनेर तसेच विधानसभेमध्ये पश्चिम आणि नगर परिषद व महानगर पालिका निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी बजाविली आहे. यामुळेच सूरज गुप्ता यांना यावेळी संधी मिळाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रचार यंत्रणेमध्ये यवतमाळमधील एक युवा कार्यकर्त्याला संधी मिळणे अभिमानास्पद बाब असल्याचा आनंद सर्व व्यक्त करत आहेत.