पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
४ हजार ६८७ रुग्णाची तपासणी
रुग्णांना मोफत चष्मे वाटप
नागपूर,
आपले आरोग्य हेच खरे धन आहे. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यानो केले. कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा संस्थान, जिल्हा खनिज प्रतिष्ठान व मह्राराष्ट्र शासन यांच्या सयुक्त विद्यमाने मौदा तालुक्यात येथे आयोजित करण्यात आलेल्या महा आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिबिरात ४६८७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७५६ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
गंभीर आजारांवर नियंत्रण
Chandrashekhar Bawankule बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाले आहे. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवता येते. निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत सर्व शासकीय सुविधा या जनतेच्या दारापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ग्रामीण भागात अशी २० शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. पुढील शिबीर ११ एप्रिलला धानला येथे होणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर विविध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार या आरोग्य शिबीरात रोग निदान पर्यंत मर्यादित न राहता शिबिरानंतर सर्व गरजूंना विविध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळवून दिले जाणार आहेत.सर्व शासकीय योजना तसेच श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान मार्फत मदत निधीतून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे कार्य सुरु झाले आहे. नोंदणी करणार्या सर्व रुग्णांना रक्तदाब, शर्करा तपासणी पॅथॉलॉजी चाचण्या शिबिरातच मोफत करण्यात आल्या.