प्रदर्शन महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ

    दिनांक :22-Mar-2026
Total Views |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारणार
 
नागपूर,
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून सरस प्रदर्शनाचा हा ब्रँड दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी म्हणून कार्य करत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन Chief Minister Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
saras-reshimbag-one
महिलांच्या उद्योगाना चालना
रेशिमबाग येथे आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनीला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रदर्शनीत सुमारे ४०४ स्टॉल्स उभारण्यात आले असून आतापर्यंत १० कोटी रुपयांची विक्री झाली आहे. ही विक्री पुढील काळात आणखी वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ३ ठिकाणी महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरविण्यात येते आणि या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते यामुळे महिलांच्या उद्योगाना मोठी चालना मिळत असून पुढे त्यांना अधिक संधी निर्माण करून देण्याचे काम शासन करणार आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून महिला अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटक आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एक कोटी महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट
राज्यात ‘लखपती दीदी’ अभियानांतर्गत १ कोटी महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने सर्व ३४ जिल्हा परिषदामध्ये उमेद मॉल उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या व्यक्त करतांना सांगितले. नागपूर येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन अत्यंत उत्तम झाले असून यासाठी १०० पैकी १०० गुण देतो आणि महिलांसाठी महालक्ष्मी सरस च्या माध्यमातून मिळणारी हक्काची बाजारपेठ दरवर्षी नागपुरात उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य
महिलांचे कौशल्य वाढविणे, त्यांच्या उत्पादनांचे व मार्केटिंग करणे आणि त्यातून त्यांची उत्पादने परदेशात पाठविण्यासाठी शासन काम करनार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवसखी उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून काम नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने योजना आखून १ लाख रुपये महिला बचत समूहाना उपलब्ध करून दिले. आणि त्यातून खर्‍या अर्थाने महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम आहे असे मत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले.
नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण
यावेळी नागपूर जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीदी की रसोई उपहारगृह, प्रोजेक्ट ड्रीम १०० विलेज लायब्ररी, १४ आय सी टी लॅब झेड. पी. स्कूल, ए आय लॅब ऑन व्हील- ज्ञानरथ, सुपर ४० अंगणवाडी, गुरुकुल आय लॅब ४८ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण केले आणि केलेल्या कामांचे त्यांनी कौतुक केले. तसेच भविष्यात जिल्हा परिषदेमार्फत १०० पेक्षा अधिक वाचनालये उभारण्यात येणार असून उपक्रमाचा देखील शुभारंभ Chief Minister Devendra Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
 
महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट
सोबतच महालक्ष्मी सरस येथील महिला बचत गटांच्या स्टॉल्सला भेट महिलांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची विक्री, बाजारपेठेतील प्रतिसाद आणि येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. या प्रसंगी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, आमदार खोपडे, आमदार चरणसिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती.