मुंबई,
LPG supply महाराष्ट्रातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे आणि औद्योगिक कॅन्टीन उद्योगांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चालत आलेल्या एलपीजी तुटवड्याचा मोठा फटका केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कमी होणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक LPG पुरवठा २० टक्क्यांनी वाढवण्याचा आदेश दिला असून, यामुळे राज्यातील एकूण गॅस पुरवठा ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अनेक हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले होते. पुरवठ्यातील या तुटवड्यामुळे काही हॉटेल्सना आपले संचालन कमी करण्यास भाग पाडले गेले, तर काही ठिकाणी सेवा अर्धवट राहिली होती. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानंतर हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया तसेच दुग्धव्यवसायांना अतिरिक्त पुरवठा मिळणार आहे. यामध्ये राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन व समुदाय किचन्सलाही प्राधान्य दिले जाणार आहे.
मंत्री भुजबळ म्हणाले की, LPG supply “केंद्राच्या आदेशामुळे व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्वीसारख्या कठीण परिस्थितीपेक्षा आता अधिक सुलभ होईल. त्यामुळे खाद्यसेवा उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, पुरवठा मिळविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी तेल विपणन कंपन्यांकडे आवश्यक नोंदणी आणि पाईप नैसर्गिक गॅस (PNG) साठी अर्ज करणे आवश्यक आहे.”उद्योग प्रतिनिधी म्हणतात की, या निर्णयामुळे व्यवसायिक क्षेत्रासोबतच रोजगाराच्या संधींवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करून पुरवठा साखळी अधिक सुदृढ करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्यामुळे हा निर्णय उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.राज्यभरातील हॉटेल्स, ढाबे व उपहारगृह व्यवसायिक आता आपल्या सेवांचा स्तर पूर्ववत राखू शकतील, तर ग्राहकही गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींपासून मुक्त होतील. या निर्णयाला व्यवसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.या LPG supply निर्णयामुळे राज्यातील खाद्यसेवा उद्योगाला नवे उर्जा मिळणार आहे आणि गॅस पुरवठ्याच्या समस्या लवकरच कमी होतील, अशी आशा आहे.